मंगळवार, ७ जून, २०११

आम्ही बावर्ची जाहलो !

आम्ही बावर्ची जाहलो !

सलाम सैनिक (लेह-लडख-कारगील) मोहीम चालु होऊन आजचा १५ वा दिवस ऊजाडल होता. आजचा दिवस आरामासठी राखीव होता. सकाळी न्याहारी कारता करता गप्पाच्या ओघात कधी आम्ही सगळे घरच्या ज़ेवणा पर्यंत कधी पोचलो कळालेच नाही.सगळ्यांनाच घरच्या जेवणाची आठवण येत होती

संजयने प्रस्तव मांडला आज आपण आपल्या पद्धतिचे जेवण बनऊया का? सगळ्यांचा एक मताने होकार आला. आम्हच्यातले २-3 जण होते त्यांना जेवण बनवणे हा प्रकर माहीतिच नव्ह्यता म्हणुन त्यांनी बाजारातुन सगळे सामन आणायची जबाबदरी हाती घेतली. पण प्रश्न होता कि हॉटेल मालक आपल्याला त्यांचे संयपाक घर वापरु देतील का? त्यांना आम्हि आमचा बेत सांगीतला त्यांनी ही लगेच संमती दिली. आणी महाराष्ट्रियन पद्धतीचे जेवण आमच्या साठीही बनवा असे सांगितले आम्ही १३ जण आणी ते ४ जण अशी १७ जणांच्या पंगतीची तयरि सुरु केली.

लेह-लडख मधे पश्मीना नावाची बकरीची जात जगप्रसीध्द आहेच.


आम्ही पश्मीना बकरीचे मटण रस्सा,सुकी कलेजी,जाडसर कोंबडीचा रस्सा(कोंबडी जाडसर नाही रस्सा जाडसर),डाळ,भात,चपाती असा मेनु ठरवला आणी त्या प्रमाणे सग़ळे सामन आणाले आणी जणुकाही आम्ही त्या हॉटेल च्या संयपाक घरावर कबजाच केला. सगळ्यांनी आपापल्या परीने हात-भार लावले कामाला.













मटण रस्याची जबाब दरी संजयने घेतली होती.



त्याने मटण शीजायला कुकर मधे ठेवले,अनुजा किती शीट्या घ्याव्या लागतीलग मी आपल्या नेहमिच्या अंदजे ६-७ घे असे सांगीतले,आम्हचे हे बोलणे तिथला कुक ग़ुरु समोरच चालले होते तेव्हा तो आम्ह्च्यावर हसत बोलला "१०-१२ सीटी में आलु भी नही पकता यहा पें मटण के लिये ३५-४० सीटी लेनी पडती है यहा" I

आम्ही एकमेकांकडे बघतच रहिलो आणी एकदम लक्ष्यात आले आपण किती कमी दाबाच्या पट्यात आहोत ते.

खुप धुमाकुळ घालुन एकदाचे सगळे जेवण तयार झाले.

आज आम्ही आम्हालाच खुष करायला जेवणाची थोडि फ़ार सजावट केली.


टेबलावरील सजावट आणी निट नीटकेपणा केला होता.

मस्त बावर्ची स्टाईल मधे फोटो घेतले.







मस्त जेवणाचा अस्वद घेतला.











हॉटेल मालक,हॉटेलचा मुकादम ,कुक,वेटर यांना "फ़ॉर अ चेन्ज"म्हणुन केलेले जेवण आवडले .



४ टिप्पण्या: