शनिवार, १४ मे, २०११

वाहतुक नियंत्रण पोलिस

काल संध्याकाळी काही कामा निमीत्त इर्ला (विले पार्ले)ला गेले होते , काम उरकताच ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत निघाले. अंधेरी स्थानकासाठी रीक्षा मीळण्याचा चान्सच नाही तिथुन पण तरी प्रत्तेक रीक्षेला हात दाखवतच होते. एकाने रीक्षा थांबाऊन विचाराले, "अंधेरी स्टेशन" तर उद्दटा सारखा चेहरा करुन मझ्यावराच वैताकला आणी निघुन गेला. मला हे अपेक्षीताच होते की असेच काही तरी होणार म्हणुन मी काहि लक्ष दिले नाही. तेवढ्यात त्या रिक्ष्याच्या मागच्या बाजुला उजव्या लेन मधुन कोणी तरी ओरडाले "काय हो तो नाही बोलला का? " वर पाहीले वाहतुक नियंत्रण पोलिसंची गाडी होती.

मी खुणेनीच "नाही बोलला तो"असे सांगीताले आणी त्यागडी चालकाने ग़ाडीचा वेग वढाऊन ज्यानीं मला विचारले होते त्यानिं त्या रीक्ष्यावर जोर जोरत हाताने २-३ थाप मारले आणी त्या चालकाने त्या रीक्ष्या समोर त्यांची गाडी आडवि घतलि त्या रिक्ष्यावाल्याला चार गोष्टि सुनावल्या . तो पर्यंत मी मागुन धावत येऊन त्या रिक्ष्यात बसले . आणी त्या वाहतुक नियंत्रकाना धन्यवाद देउन निघाले. स्टेशन वर पोचे पर्यंत १८ रु मिटर झाले होते माझ्या कडे ८रु सुट्टे नसल्याने मी २० रु दिले त्याने १५ रु घेताले आणी पैसे देता देता बोलला "अभी छुट्टे के लीये मच मच किय तो और एखाद पुलीस वाला देखेगा बीना भाडा लिये भागना पडेगा"

१० टिप्पण्या:

  1. हा तसा सार्वत्रिक अनुभव.. बडगा दाखवल्याशिवाय सुधारत नाहीत हे लोक...

    तू विलेपार्लेला इर्ला असे का लिहिले आहेस?? माझे आपले कुतूहल... :)

    उत्तर द्याहटवा
  2. हा तसा सार्वत्रिक अनुभव आहे आणी हा आनुभव बऱ्याच वेळा येतोही पण कालचा तो "सीन" अवघ्या ३० सेकंदाचा असेल पण एकदम फिल्मी टाईप होता

    माझे आपले कुतूहल... :)

    कसले रे कुतूहल ?

    उत्तर द्याहटवा
  3. पोलिसवाले स्वतःहून अनेकवेळा मदत करतात हा माझा देखील अनुभव आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. जिथे तुला रिक्षा मीळत नाही तिथे आमचा तर नंबरच नाहि...
    अशिच अद्दल घडली पाहिजे यांना...
    बाकी वसई मोहीमेचा परीणाम दिसला... :)

    उत्तर द्याहटवा
  5. हो रे आका तुम्हाचा नंबरच नसता लागला ;-)


    बाकी वसई मोहीमेचा परीणाम दिसला. कोणता ?

    उत्तर द्याहटवा
  6. विलेपार्लेचं काम नक्कीच खाण्याबद्दलचे असणार ;-)

    उत्तर द्याहटवा
  7. नाही रे पंक्या ! हल्ली खादर मित्र मैत्रिणी भेटेनासे झालेत :-(

    उत्तर द्याहटवा
  8. का बरं? एखाद्या वेळी मला बोलावून बघ की, बघ कसा येतो पळतपळत.

    उत्तर द्याहटवा
  9. अरे तू ही तसाच येतो येतो सांगुन अजुन येतोय.

    उत्तर द्याहटवा