सोमवार, ६ जून, २०११

आई मावशी मावशी आई

आई मी मावशीकडे जाते. अग दिवसभरात १० वेळा तर फ़ेर्‍या मारात असतेस अजुन काय तुझ नवीन का हे "आई मी मावशीकडे जाते" (आईच आणी मावशीच घर तस २ -२५ पावलावरच)

आई मला मावशी खाऊ देते, नविन कपडे पण देते, आणी मी गेली का मला ती स्वता काही ना काही भरवतच असते. आणी ती मावशीकडची आजी माझ्यासाठी सुकी द्राक्ष आणी सुका ख़जुर पण देते. आणी तु आणी आपली आज़ी कधीच काही देत नाही.

हे त्या दिड-दोन वर्षाच्या कोवळ्या पोरीचे बोल एकत तिची आई तिच्याकडे एकटक बघत हसुन म्हणली जा तुझ्या मावशीकडेच आणी रहा तिच्या कडेच कायमची मी एकदम खुष होऊन पळाले, पण थोडावेळतच मी मवशीला म्हाटले मी जाते मला आई कडे जायचे आहे तिने ख़ाऊ नाही दिला तरी चालेल. आणि ते कवळे पाय घरा कडे धावले.

असे त्या चिमुरडिच्या बाबतीत नेहमीच होत असे.

सकाळी गाईचे दुध काढुन झाले कि आई मला रोज मामा सोबत मावशी कडे पठवीत असे. हे त्या चीमुरडीचे नित्य असे.

असेच एक दिवस सकाळी सकाळी मावशी आणी मामा काही कारणा वरुन जोर जोरत भांडात होते. आणी आजी त्याना हळुच सांगत होती तुम्ह्च्या पाई त्या कोवळ्या जिवाचा का छळ मांडला आहे.

आई आज खुप शांत होती तीने मझी रोजसारखीच तयारी केली मी आणि मामा मावशी कडे जायला नीघालो आज रोज सारखा मामा नवीन काहि तरी गंम्मत सांगणार पण आज मामा पण शांत होता" मामा आज कोणाची गंम्मत " माझ्या कडे आज एक गंम्मत होति पण तुझ्या मवशीने दम दिला आहे मला सांगु नको नाही तर सांगिताले असते ".

मला कहीच कळले नाही मी त्याच्याकडे बघतच रहिले.

"अग तु जीला आई सांगतेना ती तुझी आई नाही आणी मावशी सांगते ती मावशी नही."

मला मामाचे बोलणे कहीही कळेना आणी यात गंमत ती काय होती? मी ते कहिच न बोलता चालत होते. आणी मावशीकडे पोचल्यावर मामा जायचीवाट बघत रहिले.

मामागेल्यावर मी मावशीला विचारले "अग तु जीला आई सांगतेना ती तुझी आई नाही आणी मावशी सांगते ती मावशी नही." अशी आज मला मामाने गंमत सांगितली.पण त्यात कही गंमतच नव्हती ग मावशी. तेव्हा मला मावशीने सारा प्रकार सांगीतला
तेव्हा मला सारे समजण्या पलीकडे होते. पण मी त्याच दिवशीपासुन मावशी म्हणजे आई कडे राहायला आले.

पण हि गंमत जशीच्या-तशी माझ्या मनात कोरुन राहिली ती ही कायमची.


अनुजा सावे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा