बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

गोपाळकाला (कृष्ण जन्माष्टमी)

गोपाळकाला (कृष्ण जन्माष्टमी)

आमच्या गावात सगळे सण उसत्व आम्हि एकत्रच साजरे करतो मग ते गणपती,दिवाळी, रांगपंचमी (होळी),असो वा दहीकाला.या बाबतीत आम्हि सगळे गावकरी एकदम गुण्या गोवींदाने रहतो.
आम्हच्या गावातील सार्वजनीक कृष्ण जन्माष्टमी आम्ही आमच्य घरी साजरी करयचो (तसे बरेच सर्वजनिक कर्यक्रम आमच्या घरी साजरे होतात घर मोठे असल्याने) या दिवशी गावची सार्वजनीक पूजा उरकली की रत्रि १२ वाजेपर्यन्त भक्तिगित,भावगीत,भजने चालु असतात रत्री १२ वाजत कृष्णजन्म झला की पळणा गाऊन सार्‍या भगीनि बाल गोपळाला ओवाळुन आणी सार्‍याना सुंठ साखरेचा प्रसाद वाटला. आणी पुन्हा गाण्याची महेफ़िल रंगली.

शळेत असताना आम्ही मुलीहि दहीहांडी फ़ोडायचो खास आम्हच्या सठिहि एक हांडी बांधली जायची (२ थराचिच) आणी मी मात्र सग़ळ्या भावंडान सोबत एक हांडी फ़ोडायचे (४थरावर)

पण २००६ पासुन हा योग कही आला नही सुट्टी नसल्याने हांडी वैगरे सारेकाही बंद झाले होते.

रात्री १ च्या दरम्यान झोपी गेले सकळीइ ५.३० ला उठुन कामावर जायचे होते ना.
सकाळी उठल्यावर ऑफ़िस ला जायचे मन बिलकुल नव्हते पण तरी ही तयरी करुन निघलो,आणी अचानक विचर आला मनात कि जर आपन हंडी ट्रेन मध्ये फ़ोडली तर कय धम्मल येइल ना म्हणुन पटकन मळ्यावर चढुन मडके काढले आणिअ वडीलांनी मला त्यासठी दोर वैगरे तयर करुन दिला,लहान बहीणीने बागेतुन फुले आणली हंडिच्या सजावटीसठिअ आणी आई ने लगेच माल दही-पोहे भिजाऊन दिले ,लहन भावने पटकन नरळ साफ़ करुन दिला ,आणी आंबोत घेउन आला. आम्हची हंडी ची तयरी पुर्ण झाली आम्ही दोघि बहीणी धवपळ करत स्टेशनवार पोचलो ट्रेन पण अगदि वेळेतच आली होती, नशीब घरी सगळ्यांनी हांडी तयार करायला हातभार लावाला नाही तर आज ट्रेन गेलीच असती आम्हची.
ग़डी मधे चढल्या चढल्या सगळे वैतकुन बोलत होते अरे बघ ना सरकरी नोकरी वल्याना सुट्टि आहे आणी आपनाच सगळी मज़्ज़ा सोडुन चाल्लोय ऑफ़िसला. तेवढ्यात मी त्याना गडीत हंडी फ़ोडायची कल्पना बोलुन दाखवली सगळ्याना नवल वाटले आणी खुश पण झाले “अग पण अनुजा तु काल का नाही ग बोल्लिस आपण मस्त सगळे तयर करुन आणले असते ना आणी आज फोडली असती ना हंडी वलसाड मधे” अजुन कोणाला ही माहीती नव्हते की मी आणी चिऊ(लहन बहिण)सगळ्या तयारीनीशी आलो होतो ते .
आणि मी हळुच हंडीचे सगळे सामान बाहेर कढुन तयारी करायला सुरुवत केले आणि तेव्हा सगळयानां मझी गडीत हंडि फोडण्याची कल्पना प्रत्तेक्षात सकारताना दिसाली.आईने भिजाऊन दिलेले दहि-पोहे एक प्लास्टीक पिशवित भरुन पिशवि हळुच हांडिमधे ठेवली बाहेरुन फुलांनि सजावट केली थोडी आणि हंडीवर “वलसाड ग्रुप” असे चिटकोरे लिहुन चिकटवले.


ग़ाडीच्या छताला असलेल्या फ़ॉन आणि ट्युबच्या आधाराने खुप कष्टाने हंडी बांधाली.

आजु बाजुच्या कंम्पारमेंट मधे ही आम्ही हंडीचे आमंत्रण केले सगळे आल्यावर चिऊ ने हंडी फ़ोडान्याचा चान्स पटकावला. (लहान असल्यामुळे) त्यातल प्रसाद सगळयांना वटला.


आम्ही सगल्यांनी गडीतील हंडी खुप एन्जोय केलि होती आणि आता सगळ्यांनाच आपापल्या ऑफ़िसला कधी जतो आणि ही गडीतील हांडी फ़ोडन्याचा आगळा वेगळा आनंद कधी संगतो असे झाले होते .


“गोवींदा रे गोपळा येशोधेच्या तान्या बाळा “

अनुजा सावे

सोमवार, २३ ऑगस्ट, २०१०

रक्षाबंधन


२००८ च्या रक्षाबंधनाच्यावेळी मी लेह-लडाख-कारगिल येथे "सलाम सैनिक " या मोहिमेत होते.तसे मी बरीच वर्ष झाले कोणालाच राखी बांधत नव्हते अगदी सख्या भावाला सुद्धा नाही.पण २००८ चे रक्षाबंधन माझ्या साठी खऱ्या अर्थाने रक्षाबंधनच होते."मी लहान असताना मला कोण्या मोठ्या काढून सांगण्यात आले होते की रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावाने आपले रक्षण करणे असते आणी त्या साठी आपण राखीपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधतो."
पण माझा भाऊ माझ्या पेक्ष्या ९ वर्षाने लहान असल्याने त्याचेच रक्षण आम्हा बहिणींना करावे लागते आणी त्या वर्षी पसून मी राखी कोणाला बांधली नव्हती, उलट नंतर नंतर असे झाले की माझ्या काही मैत्रिणी मला राखी बंधू लागल्या की ही आमची नेहमीच काळजी घेत असते,आणी काही आर्थी हीच आमचे रक्षण करते म्हणुन त्या मला राखी बांधत असत.
पण जेव्हा मी २००८ ला आपल्या लेह-लडाख-कारगिल येथे आपल्या जवानांना(सैनिक)आपल्या देशाचे रक्षण करताना पहिले तेव्हा मात्र मला त्यांना खऱ्या अर्थाने राखी बांधावीशी वाटली.आणी या रक्षाबंधनाच्या वेळी काही सैनिकान सोबत झालेले संवाद अजून जसेच्या तसे हृदयात साठवलेले आहेत .


ई एम ई वर्क शॉप-द्रास

एक सैनिक(मराठी-कोल्हापूरचे)

"इथे आज पर्यंत बरेच पर्यटक येऊन जातात काही मदत लागली की त्यांना आमची आठवण येत,पण असे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय की कोणी खास इतक्या लांबून सैनिकांना खास सलाम करण्यासाठी आला आहात आणी त्या साठी तुम्ही तुमच्या मोहिमेच नाव पण "सलाम सैनिक" ठेवले आहे.
आणी न विसरता तुम्ही इथील हजारो सैनिकान साठी हजारो राख्या पण घेऊन आला आहात.

एक सैनिक(ओरिसा)
"अरे हमारी बहेन भी हर साल राखी भेजती है पण एक भी साल हमे वो राखी वक्त पर नाही मीली पण हमारी ये बहेने आज के दीन आपने सगे भाईयो को छोडके हमे राखी बांध राही है इससे और अछा खुशीका मोका नाही हो सकता "

आणी हे सगळे चालू असतानाच माझे अचनक लक्ष्य थोड्या दूर वर एका जीप पाशी गेले आणी त्या जीप च्या पलीकडे मला कोणी तरी बसलेले दिसले म्हणुन मी आणी माझ्या सोबत सत्तेन तिथे गेलो आणी तिथे दोन सैनिक बसलेले दिसले आणी मी तिथे पोचताच त्या सैनिकाने आपले तोंड त्याच्या ओंजळीने झाकून घेतले,खूपदा विचारले काय झाले?आमचे काही चुकले का?की अजून काही झाले?आणी बऱ्याच वेळाने त्यांनी त्यांच्या बहिणीची व्यथा सांगायला सुरवत केली.आणी शेवटी असे काळाले की काही दिवसान पूर्वीच त्याची बहिण वारली होती आणी त्यांना सैनिकांचा असा रडणारा चेहरा आम्हाला दाखवायचा न्हवता म्हणुन ते असे लपून बसले होते.
मी ही जास्त काही न बोलता त्यांना राखी बांधली आणी गोड त्याच्या हातात ठेऊन मी पुन्हा सगळ्यां सोबत येऊन थांबले .

आम्ही १५ ऑगस्ट पासूनच रक्ष्याबंधनाला सुरवात केली होती कारण एकदा का एखादा सैनिकांचा पोस्ट निघुन गेला की आम्हीला प्रत ते भेटणार नव्हते,असे आमी सतत ३ दिवस रक्ष्याबंधन केले.खूप ठिकाणच्या खूप सैनिकांच्या खूप आठवणी आमच्या सोबत होत्या .
आणी या जन्मातले खऱ्या अर्थेने झालेले हे रक्षाबंधन होते .

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

महाराजा लस्सी

महाराजा लस्सी

तशी माझी खादाडी जवळ जवळ रोजच चालू असते म्हणा कारण मी काहीही खाताना त्या गोष्टीचा पूर्ण आस्वाद,आनंद घेते म्हणुन माझी खादाडी मला नेहमी हिट झाल्या सारखी वाटते.
तसे पहिले तर मी पक्की मांसहारी आहे शाकाहार तसा मला जास्त जमत नाही.
बरेच वेळा बझ्झ वर आमच्या मांसहारी खादाडीवर शाकाहारवाले बऱ्याचदा नि.....षे......ध....... करतात :-) :-) :-) म्हणुन आज खास व्हेज खादाडी वर लिहायचे ठरवले.
मला तशी बाईक राईड ची आवड पहिल्या पासूनच खूप आहे.त्या मुळे आम्ही बरेच जण नेहमी गाड्या पळवण्यासाठी खास मुंबई गुजरात महामार्गावर जातो असेच एकदा आम्ही गड्या कडून रस्त्यावर हाकल्या त्या वेळी मनोर(मस्तान नका)पासून गुजरातला जाण्याऱ्या माहामार्गाचे नुतनीकरण झाले होते आमच्या गाड्या सुसाट पळत होत्या त्या दिवशीचा आमचा हाय-स्पीड १३९ की.मी पर्यंत गेला होता,मी त्या वेळी फोटो काढायचा प्रयत्न केला पण काही जमले नाही गाडीचा वेग थोडा कमी झाल्यावर मला १२६ की.मी चा फोटो मिळाला.
आणी आमच्या गाड्या जाऊन पारसी डेअरील्यांड,वापी(गुजरात)ला जाऊन थांबल्या खास महाराजा लस्सी प्यायच्या निम्मिताने आज आम्ही इथे आलो होतो.या आधी इथे फक्त मीच येऊन गेले होते त्या मुळे सगळ्यांनी माझ्यावरच सोडले इथले खास जे काही असेल ते तूच मागाव म्हणुन.माझी तीथली पहिली पसंद महाराजा लस्सी आणी मग सीताफळाचे आईसक्रीम पण सगळ्यांना महाराजा लासीचा आग्रह केला तसे मी त्यांना सांगीतले की आपण घरून जेऊन आलो आहोत त्यामुळे एकाला एक लस्सी संपायची नाही त्यामुळे आपण दोघानमीळून एक घेऊ असे सुचवले पण काय एक से एक खादाड सगळे माझ्यासारखेच .

आणी जेव्हा प्रत्तेक्ष्यात महाराजा समोर प्रकटला तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे बटाट्या एवढे होऊन एकमेकांन कडे फीरु लागले.

पहाच फोटो मध्ये खरच नवा सारखाच तो महाराजा थाट त्या लसीचा.

मस्त पितळेच्या ग्लासा मध्ये घट्ट लस्सी त्यावर खुपसा माव्याचा चुरा.
या लस्सीचे विशेष म्हणजे ही लस्सी प्यावी नाही लागत खावी लागते.

आम्ही आमच्या पोटावर जबरदस्ती करून लस्सी रीतीकेली एकदाची.

खादाड अनुजा

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

खादाड देशाची खादाड प्रजा

सुधागड सर करण्या पूर्वी खादाडी गड सर केला "आरफा"


सुधागडला जायचे ठरले खरे पण रविवारी सकाळी मुंबईहून लवकर निघणे मला आणी आषुला जमणारे नव्हते म्हणून आम्ही शनीवारी रात्री उशिरा मुंबईहून निघायचे ठरवले.मला आणी आषुला शनीवारी पूर्ण दिवस ऑफिस असते,दीपकला अर्धावेळच ऑफिस होते पण एवढ्या लवकर ऑफिस मधुन निघुन करायचे काय? म्हणुन तो ऑफिस मधेच रागवत :-) (शास्त्रीय संगीतातील राग ऐकत) बसला.आणी सुहासला रजा असल्याने तो आम्हाला अंधेरीला ८ वाजता भेटणार होता. मी ऑफिस मधून ५.३० निघणार होते आणी ६ वाजताच अंधेरीला पोचणार होते, दीपक पण ६ वाजताच येणार होता अंधेरीला आणी आषुला पोचायला ७ वाजणार होते आणी मग एकटा सुहासच का उशिरा येणार म्हणजे मी आणी दिपकनेच संद्याकाळच्या ६ वाजेपासून का पकायचे म्हणून मी आषुला घाई करत यायला सांगितले आणी दीपकला सांगितले तु पण सुहासला लवकर यायला सांग."फक्त आपणच का पकायचं ? पकायचं तर सगळ्यांनीच", पण सुहास काय लवकर आलाच नाही पण आषु मात्र ७.१५ पर्यंत पोचला होता. संध्याकाळच्या ६ वाजेपासून किती गाड्या गेल्या, कशी लोक गेली,ती बघ कशी चालतेय , आईला तो बघ ना काय लटकतोय ट्रेन च्या दरवाज्यात .....आणी अजून बरेच काही आम्ही बघत बसलो होतो सुहास येई पर्यंत , आणी एकदाच सुहास ८ वाजता पोचला पण तो पोचे पर्यंत माझ्या पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले होते आता त्यांच्या पिंडाला शिवायला कावळा माझ्या पोटात शिल्लक राहिला नव्हता (भुक आता अनावर झाली होती)
आता जास्त वेळ वाट बघण्यात अर्थ नव्हता लवकरात लवकर काही तरी पोटात जाणे गरजेचे होते नाही तर माझे काही खरे नव्हते (मला भुक बिलकुल सहन नाही होत).
कुठे जायचे? काय खायचे? हे ठरवण्यासाठी मी उगाच वेळ वाया घालवला नाही मला माहित असलेल्या अंधेरी-जोगेश्वरीच्या मध्यात आंबोली फाट्या समोरच "आरफा" नावाचे हॉटेल आहे तिथे जाऊन धडकलो एकदाचे, पटकन जागा पकडून बसलो आणी थोडा ही वेळ न दवडता लगेच फर्मान सुटले "चिकन तंदुरी" कोणाचाही हु की सु पण नाही झाले ..... पुढची ऑर्डर काय करायची हे ठरून होई पर्यंत तंदुरी हजर.


एक डोळा तंदुरीवर आणी एक डोळा मेनू कार्ड वर होता ;-)
"मटण अफगाणी,मटण शीग कबाब मसाला ,रोटी ,डाळ ,राईस" हु श श श श अहो समोर कोंबडी उद्या मारत होती ना म्हणुन एकदाची ऑर्डर देऊन मोकळे झाले ,सगळ्यांनी होकारार्थी मना हलविल्या .


सगळे अगदी सत्ते पे सत्ता मधील नायक बनले होते आणी या वेळी मी बिग-बी ची भूमिका निभावत होते .अहो म्हणजे मी फोटो काढे पर्यंत सगळे त्या तंदुरी कडे बघत बसले कधी ही एकदाची फोटो काढते आणी आम्ही कधी खायला सुरवात करतो (तुट पडो भूमिका निभावतो).

आषु आणी सुहास तर सुसाट सुटले होते, थोडा वेळाने त्या दोघांना जाणवले की त्याचा स्पीड थोडा जास्तच आहे पण हे जाणावे पर्यंत ताटात जास्त काही शिल्लकच नव्हते.दीपक अजूला-बाजूला बघून जेवत होता.आणी मी मात्र मस्त फोटो काढत आणी जेवनाच पूर्ण आनंद लुटत जेवले.


पोट आता तुडूंब भरले होते तरी आम्ही कोक मागवला कोक पिताच क्षणी खादाडीची मस्त पोच पावती मिळाली (ढेकर आले हो) खूप मस्तच खादाडी झाली होती. (ज्या खादाड देशाचा सेनापतीच(रोहन) एवढे खादाड असतील तर मावळे काही कमी नाहीत खादाडीत)
जागेवरून उठायची पण कोणात हिम्मत नव्हती सगळ्यांना जेवण इतके चढले होते. जेमतेम स्वःताला उचलून (अहो एवढे जेवण झाल्यावर चालायची ताकात नव्हती) आम्ही आरफा चा निरोप घेतला .


समोरच पानाची टपरी दिसली आणी सगळ्यांच मन झालं गोड पान खायचं, पान खाऊन आम्ही हळू हळू स्टेशन कडे कूच केला .

खादाडी अनुजा

गुरुवार, २९ जुलै, २०१०

उसाटगिरी

नाणेघाट :माळशेज घाट
नेहमी प्रमाणेच आम्ही रात्री १२ नंतर वसई हून निघालो नाणेघाट साठी. आम्ही तब्बत ४९ जण होतो या ट्रेकला तसे पहिले तर "वसई एडवेंचर क्लब" चा ट्रेक म्हटले की "शीत तिथे जमतील भूत" प्रमाणे पूर्ण ट्रेक परीवार एकत्र येतो या परीवारात आजी-आजोबा, काका-काकी,मामा-मामी,मावशी,आत्या,खूप साऱ्या बहीणी- भावंडे आणि लहानसा गोंडस असे बालक पण असते. आहो विचार काय करता आपला क्रिश हो चिमुरडा अवघ्या साडे चार वर्षाचा आहे पण एका दमात त्याने नाणेघाट सर केला तसा तो गेली ३ वर्षा पासून ट्रेक करतो .
रात्रभर बस मध्ये डुलक्या टाकत पेंगत पेंगत आम्ही भल्या पहाटे ३.३० वाजता नाणेघाटच्या पायथ्याशी पोचलो.


बस मधेच थोडावेळ गाणी बोलत ,गप्पा मारत आणि काही जण झोपत असा वेळ घालवला. ५ वाजेपर्यंत हळू हळू पूर्ण बस मध्ये जग आली आणि मग जो तो ब्रश घेऊन बस मधून पाय उतार झालो . आणि दर्शन दादाने लगेच चहाला आदाण ठेवले आणि त्यात अजून चव वाढवण्या साठी सुहास बंदू योगेश (बाब्या) असे सगळे मिळून चाहत ढवळा-ढवळ करून लागले, त्या ढवळा-ढवळी मुळे चहाची चव मस्तच होती .न्याहारी साठी जोडीला प्याटीस घेऊनच गेलो होतो मस्त चहा न्याहारी उरकून आम्ही पायथ्याशी मोठासा गोल करून उभे राहिलो नेहमी प्रमाणेच सगळ्यांची ओळख परेड झाली आणि दर्शन दादाने काही महत्वाच्या सूचना करून आम्ही सगळे रवाना झालो.काही पावले चालून गेल्यावरच पाण्याचा खूप खळ खळाट सुरु झाला आमच्या उजव्या बाजूला खूप मोठे पाण्याचा ओहोळ वाहत होता . तिथेच ओहोळामध्ये पाय सोडून बसावेसे वाटत होते ,पण जास्त वेळ थांबता आले नाही तसेच आम्ही पुढे निघालो थोडे अंतर चढून जातो ना जातो तोवर समोर मस्त ओहोळ वाहत होता त्यातूनच आम्ही वाट काढून गेलो .(आमची इच्छाही पूर्ण झाली )

पुढील वाट घनदाट झाडीतून जाणारी होती ,बऱ्याच ठिकाणी झाडी काटेरी होती कट्या कुट्या तून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो .
४० मिनीटे चालून गेल्यावर थोडे सपाट मैदान लागले तिथे १० मिनिटांचा थांबा होता .


पुन्हा आम्ही वरची वाट धरली पुढील बराचसा रस्ता खडकाळ होता.घाटातून धाव घेत घाली येणाऱ्या पाण्यातूनच आम्ही वर चाललो होतो .पऊस असल्याने आणि पाण्याच्या प्रवाह मुळे आमचा वेग थोडा कमी झाला होता .आम्हाला चढून जायला २.१५ मिनीटे लागली .


नाणेघाट चढून गेल्यावर प्रथम दर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्वपूर्ण वैशिष्ट आहे . या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणा-या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्य भागातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत. हा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत.

गुहेच्या डाव्या बाजूलाच थोडी वर चढत जाणारी वाट म्हणजेच "नाणेघाट ".


नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला होता . प्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर कोरून (फोडून) ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचे राज्य सुमारे इ.स पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स नंतर अडीचशे वर्षेअसे जवळजवळ पाचशे वर्ष होते. प्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जात असे . या व्यापार्‍यांकडून जकात(कर) जमा केली जात असे . त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे आपल्याला पहावयास मिळतो. नाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यांनी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजागी दोन ते पाच मीटर रूंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळीच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात होता . जकातकर रुपाने यात तत्कालीन 'कर्षापण' नावाची नाणी टाकली जात असत.पूर्ण नाणेघाट फिरून झाल्यावर आम्ही पोट पूजा उरकली .
आता पावसाने चांगलाच जोम धरला होता आणि ढगही खूप होते "मला बराच वेळ ढगात असल्या सारखे वाटले ". ;-)


जेवण उरकून आम्ही परतीच्या वाटेला लागलो , चांगलेच घुडगाभर पाणी होते वाटेत .धडपडत,सावरत,गोल करत करत आम्ही खाली उतरत होतो ,पावसाचे फटकारे तोंडावर बसत होते .(पावसाने चांगलेच झोडपले आम्हाला ) पावसाच्या वेगाने आमचा वेग खूप मंदावला होता आम्हाला जेवढा वेळ चढायला लागल्या त्या पेक्ष्या थोडा जास्त वेळ आम्हाला उतरण्य साठी लागला .
परतीची वाट पाकड्या आधी आम्ही माळशेज घाटात जाऊन धबधाब्या दुम्बायचे होते .

मनसोक्त पाण्यात दुम्बा दुम्बी केल्यावर आम्ही परतीची वाट धरली .