महाराजा लस्सी
तशी माझी खादाडी जवळ जवळ रोजच चालू असते म्हणा कारण मी काहीही खाताना त्या गोष्टीचा पूर्ण आस्वाद,आनंद घेते म्हणुन माझी खादाडी मला नेहमी हिट झाल्या सारखी वाटते.
तसे पहिले तर मी पक्की मांसहारी आहे शाकाहार तसा मला जास्त जमत नाही.
बरेच वेळा बझ्झ वर आमच्या मांसहारी खादाडीवर शाकाहारवाले बऱ्याचदा नि.....षे......ध....... करतात :-) :-) :-) म्हणुन आज खास व्हेज खादाडी वर लिहायचे ठरवले.
मला तशी बाईक राईड ची आवड पहिल्या पासूनच खूप आहे.त्या मुळे आम्ही बरेच जण नेहमी गाड्या पळवण्यासाठी खास मुंबई गुजरात महामार्गावर जातो असेच एकदा आम्ही गड्या कडून रस्त्यावर हाकल्या त्या वेळी मनोर(मस्तान नका)पासून गुजरातला जाण्याऱ्या माहामार्गाचे नुतनीकरण झाले होते आमच्या गाड्या सुसाट पळत होत्या त्या दिवशीचा आमचा हाय-स्पीड १३९ की.मी पर्यंत गेला होता,मी त्या वेळी फोटो काढायचा प्रयत्न केला पण काही जमले नाही गाडीचा वेग थोडा कमी झाल्यावर मला १२६ की.मी चा फोटो मिळाला.
आणी आमच्या गाड्या जाऊन पारसी डेअरील्यांड,वापी(गुजरात)ला जाऊन थांबल्या खास महाराजा लस्सी प्यायच्या निम्मिताने आज आम्ही इथे आलो होतो.या आधी इथे फक्त मीच येऊन गेले होते त्या मुळे सगळ्यांनी माझ्यावरच सोडले इथले खास जे काही असेल ते तूच मागाव म्हणुन.माझी तीथली पहिली पसंद महाराजा लस्सी आणी मग सीताफळाचे आईसक्रीम पण सगळ्यांना महाराजा लासीचा आग्रह केला तसे मी त्यांना सांगीतले की आपण घरून जेऊन आलो आहोत त्यामुळे एकाला एक लस्सी संपायची नाही त्यामुळे आपण दोघानमीळून एक घेऊ असे सुचवले पण काय एक से एक खादाड सगळे माझ्यासारखेच .
आणी जेव्हा प्रत्तेक्ष्यात महाराजा समोर प्रकटला तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे बटाट्या एवढे होऊन एकमेकांन कडे फीरु लागले.
पहाच फोटो मध्ये खरच नवा सारखाच तो महाराजा थाट त्या लसीचा.
मस्त पितळेच्या ग्लासा मध्ये घट्ट लस्सी त्यावर खुपसा माव्याचा चुरा.
या लस्सीचे विशेष म्हणजे ही लस्सी प्यावी नाही लागत खावी लागते.
आम्ही आमच्या पोटावर जबरदस्ती करून लस्सी रीतीकेली एकदाची.
खादाड अनुजा
सही रे ! छान लिहिलंस!!!
उत्तर द्याहटवाबोल कधी नेतेस लस्सी प्यायला??
लय बेश्ट... भारीच प्याला
उत्तर द्याहटवाएकच प्याला...
उत्तर द्याहटवाभारी!
अरे दीपक लस्सी खायला जावे लागेल
उत्तर द्याहटवाखरच तो एकच प्याला होता पण भारी होता ;-)
उत्तर द्याहटवाएकच प्याला...
उत्तर द्याहटवाभारी!
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाहम्म्म तोंडाला पाणी सुटलं यार ........
उत्तर द्याहटवाएकच प्याला...बस्स्स....
उत्तर द्याहटवाहा हा .. भारी !! तोंडाला लस्सी ... आपलं.. पाणी सुटलं..
उत्तर द्याहटवालई बेष्ट.. माझं आवाहन मनावर घेतलं तर...
उत्तर द्याहटवा"मुक्त कलंदर" होय तुमचेच आवाहन मनावर घेतलं मी आणी लगेचच पोस्ट लिहीली
उत्तर द्याहटवाखुप छान. मग आम्हाला कधी ?
उत्तर द्याहटवा