शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

खादाड देशाची खादाड प्रजा

सुधागड सर करण्या पूर्वी खादाडी गड सर केला "आरफा"


सुधागडला जायचे ठरले खरे पण रविवारी सकाळी मुंबईहून लवकर निघणे मला आणी आषुला जमणारे नव्हते म्हणून आम्ही शनीवारी रात्री उशिरा मुंबईहून निघायचे ठरवले.मला आणी आषुला शनीवारी पूर्ण दिवस ऑफिस असते,दीपकला अर्धावेळच ऑफिस होते पण एवढ्या लवकर ऑफिस मधुन निघुन करायचे काय? म्हणुन तो ऑफिस मधेच रागवत :-) (शास्त्रीय संगीतातील राग ऐकत) बसला.आणी सुहासला रजा असल्याने तो आम्हाला अंधेरीला ८ वाजता भेटणार होता. मी ऑफिस मधून ५.३० निघणार होते आणी ६ वाजताच अंधेरीला पोचणार होते, दीपक पण ६ वाजताच येणार होता अंधेरीला आणी आषुला पोचायला ७ वाजणार होते आणी मग एकटा सुहासच का उशिरा येणार म्हणजे मी आणी दिपकनेच संद्याकाळच्या ६ वाजेपासून का पकायचे म्हणून मी आषुला घाई करत यायला सांगितले आणी दीपकला सांगितले तु पण सुहासला लवकर यायला सांग."फक्त आपणच का पकायचं ? पकायचं तर सगळ्यांनीच", पण सुहास काय लवकर आलाच नाही पण आषु मात्र ७.१५ पर्यंत पोचला होता. संध्याकाळच्या ६ वाजेपासून किती गाड्या गेल्या, कशी लोक गेली,ती बघ कशी चालतेय , आईला तो बघ ना काय लटकतोय ट्रेन च्या दरवाज्यात .....आणी अजून बरेच काही आम्ही बघत बसलो होतो सुहास येई पर्यंत , आणी एकदाच सुहास ८ वाजता पोचला पण तो पोचे पर्यंत माझ्या पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले होते आता त्यांच्या पिंडाला शिवायला कावळा माझ्या पोटात शिल्लक राहिला नव्हता (भुक आता अनावर झाली होती)
आता जास्त वेळ वाट बघण्यात अर्थ नव्हता लवकरात लवकर काही तरी पोटात जाणे गरजेचे होते नाही तर माझे काही खरे नव्हते (मला भुक बिलकुल सहन नाही होत).
कुठे जायचे? काय खायचे? हे ठरवण्यासाठी मी उगाच वेळ वाया घालवला नाही मला माहित असलेल्या अंधेरी-जोगेश्वरीच्या मध्यात आंबोली फाट्या समोरच "आरफा" नावाचे हॉटेल आहे तिथे जाऊन धडकलो एकदाचे, पटकन जागा पकडून बसलो आणी थोडा ही वेळ न दवडता लगेच फर्मान सुटले "चिकन तंदुरी" कोणाचाही हु की सु पण नाही झाले ..... पुढची ऑर्डर काय करायची हे ठरून होई पर्यंत तंदुरी हजर.






एक डोळा तंदुरीवर आणी एक डोळा मेनू कार्ड वर होता ;-)
"मटण अफगाणी,मटण शीग कबाब मसाला ,रोटी ,डाळ ,राईस" हु श श श श अहो समोर कोंबडी उद्या मारत होती ना म्हणुन एकदाची ऑर्डर देऊन मोकळे झाले ,सगळ्यांनी होकारार्थी मना हलविल्या .










सगळे अगदी सत्ते पे सत्ता मधील नायक बनले होते आणी या वेळी मी बिग-बी ची भूमिका निभावत होते .अहो म्हणजे मी फोटो काढे पर्यंत सगळे त्या तंदुरी कडे बघत बसले कधी ही एकदाची फोटो काढते आणी आम्ही कधी खायला सुरवात करतो (तुट पडो भूमिका निभावतो).

आषु आणी सुहास तर सुसाट सुटले होते, थोडा वेळाने त्या दोघांना जाणवले की त्याचा स्पीड थोडा जास्तच आहे पण हे जाणावे पर्यंत ताटात जास्त काही शिल्लकच नव्हते.



दीपक अजूला-बाजूला बघून जेवत होता.



आणी मी मात्र मस्त फोटो काढत आणी जेवनाच पूर्ण आनंद लुटत जेवले.


पोट आता तुडूंब भरले होते तरी आम्ही कोक मागवला कोक पिताच क्षणी खादाडीची मस्त पोच पावती मिळाली (ढेकर आले हो) खूप मस्तच खादाडी झाली होती. (ज्या खादाड देशाचा सेनापतीच(रोहन) एवढे खादाड असतील तर मावळे काही कमी नाहीत खादाडीत)
जागेवरून उठायची पण कोणात हिम्मत नव्हती सगळ्यांना जेवण इतके चढले होते. जेमतेम स्वःताला उचलून (अहो एवढे जेवण झाल्यावर चालायची ताकात नव्हती) आम्ही आरफा चा निरोप घेतला .


समोरच पानाची टपरी दिसली आणी सगळ्यांच मन झालं गोड पान खायचं, पान खाऊन आम्ही हळू हळू स्टेशन कडे कूच केला .

खादाडी अनुजा

७ टिप्पण्या:

  1. आहा भूक लागली, चल ऑफीसमधून डाइरेक्ट ये तिथेच ;)

    उत्तर द्याहटवा
  2. अरे हे आफरा नाही... 'आवरा.........' आहे. :P

    उत्तर द्याहटवा
  3. हे हे हे अरे रोहन त्या दिवशी खरच गरज होती रे आवरायची

    उत्तर द्याहटवा
  4. अरे हे काय, व्हेज काहीच नाही.. निषेध नोंदवतोय.. लवकरच व्हेज खादाडी टाकावी....म्हणजे आमी बी आस्वाद घेऊ...

    उत्तर द्याहटवा
  5. व्हेज खादाडी तशी बऱ्याच वेळी झाली आहे पण पोस्ट काही लिहिली नाही कधी पण आज खास तुमच्या साठी एका जुन्या व्हेज खादाडी ची पोस्ट लिहितेय

    उत्तर द्याहटवा
  6. फक्कड पैकी जमला होता तुमचा खादाडी कट्टा

    उत्तर द्याहटवा