बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२
आठवणींचे काहूर
आणी ते शेवटचे दर्शन मुंबईचे, अथांग अरबी समुद्र या किनाऱ्या पासून त्या किनाऱ्या पर्यंतचे अंतर गाठायचे होते। आणी तो धूरसट होत जाणारा समुद्र न संपणारे आभाळ तो ही त्याची अनेक रुप दाखवत होता। पण त्यात होती ती फक्त आभाळा एवढी माया. सारे काही फक्त आता त्या आठवणीत होते. झरा झर सगळे क्षण नजरे समोरून जात होते. त्या सागरा सारखे, आभाळा सारखे अनंत, अथांग...... मनात सगळ्या आठवणींचे काहूर माजले होते ते थेट तो वळवंट दिसे पर्यंत हळू हळू या मातीची न्हवे तर वाळवंटाची चाहूल जाणऊ लागली. आठवणीने भिजलेले मन हळू हळू या उष्ण वाळवंटात कोरडे होत जात होते, पण ते ही काही क्षणा पुरताच पुन्हा तोच त्या आठवणींचा पाऊस पुन्हा पुन्हा भिजवत होता मला या ओसाड ,रुक्ष,कोरड्या वाळवंटात ही .पण मला ही दाखवण्या पुरता का होईना कोरडे होणे जरुरी होते त्या शिवाय पर्याय ही न्हवता आणी असे अजून कीती दिवस राहणार होते त्याआठवणींच्यापावसात भिजत आणी इथला हा कोरडेपणा हा उष्मा मला ही हळू हळू कोरडे बनवत होता आता असेच राहायचे होते ओल्या मानाने कोरड्या देहाने.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)