तो ती आणी मी
रोज एकाच ट्रेनने येत असल्याने रोज सकाळी एकमेकांना बघण होत असे. २-३ वर्षा पासून ऑरकुट/फेसबुकवर एकमेकनंच्या फ्रेंड लिस्ट मधे होतो पण कधी काही बोलणे झाले नव्हते. ना समोरा-समोर ना कधी मेलवर ना च्याटवर किव्हा स्वतःहुन कधी बोलावेसे पण वाटल नव्हते. आम्ही जश्य २-३ मैत्रिणी नेहमी नाश्ता करायला पणशीकर मधे जात असत तसेच तो आणी त्याचे ही मित्र मैत्रीणी नेहमी येत असत, समोरासमोर येणे जवळ जवळ रोजचेच झाले होते.
आचानक एक दिवस त्याच्या एक मित्राने हळूच स्माईल दिली आणी मी ही ओळखीचाच असल्याने गालातल्यागालात हसले. आणी रोज सारखेच आपआपल्या मर्नागे निघून ही गेलो.
ऑफिस मधे येउन रोज प्रमाणेच मेल चेक करत होते, त्याच्या मित्राचा मेल होता.
"माझ एक काम आहे तुझ्या कड़े थोड़ी हेल्प हावी आहे करशील का?"
काय काम आहे,काय मदत हावी आहे हे जाणुनन घेताच मी उत्तर दिले "जमल्यास नक्कीच करेल".
आणी आवघ्या ५ मी.त्याच्या मेल आला "अग आपण एकमेकांच्या फ्रेंडलिस्ट मधे इतके वर्ष आहोत पण कधीही बोललो नाही,पण माझे एक काम आहे तुझ्या कड़े आणी माझा तो मित्र म्हणाला बहुदा तू मदत करशील म्हणुन हा मेल आणी माझा फोन नं.पण देतो जमल्यास फोन कर"
मी विचारच करत राहिले ह्या दोघांचे काय असे काम असेल ?
आणी मग थोडा वेळाने च्याटवर बोलता-बोलता समजले की "त्याला एक मुलगी आवडते माझ्याच गावची आहे आणी तिची ओळख करून हावी आहे". त्याला म्हणून तो आणी त्याचा मित्र मला मदत करायला सांगत होता.
मी म्हटले आधी कोण मुलगी आहे ते तर दाखवा मग बघुया पुढच पुढे.
उद्या सकाळी रोज सारखेच आपण तिथेच भेटूया आम्ही तुला ती मुलगी दाखवतो.
ठीक आहे .
ठरल्या प्रमाणे आम्ही भेटलो ती मुलगी कोण ते पाहिले आणी मी सांगीतले बघुया प्रयत्न करून पण मला थोड़े दिवस द्या.
आता आमचे बोलणे नियमित होऊ लागले कधी नाश्ता करताना,कधी फोनवर,कधी च्याटवर.
आणी २-३ दीवसांनी आम्ही संध्याकाळी कॉफी साठी भेटलो. त्याला बरेच काही बोलायचे होते तो त्याच्या बद्दल तीच्या बद्दल असे बरेच काही बोलत होता.
आणी त्या नंतर अवघ्या २ दिवसांनी त्याच्या बोलण्यतली "ती" कमी होताना जाणवत होती.
आम्ही एकमेकांन बद्दलच फ़क्त बोलत होतो आणी जाशी जाशी त्याच्या बोलण्यातील "ती" कमी होत होती तस तसे आमच्या बोलण्यात "आम्हीच आम्ही" होतो.
आणी हळुहळू आमचा एकमेकांन सोबत जास्त वेळ जाऊ लागला. आता जातानाही आम्ही एकत्रच जाऊ लागलो. कधी त्याला उशीर झाली की मी थांबत असे, कधी त्याला जास्तच उशीर होणार असेल तर मी त्याला त्याच्या ऑफिस बाहेर जाऊन भेटत असे. सकाळी उठल्या पासून फोन,मेसेज,च्याट हे असे झोपे पर्यंत चालू असे.
आणी सकाळी सहज बोलताना आज तिची आठवण झाली आणी सहजच मी त्याला सांगीतले अरे आज बरेच दिवसंनी ती मला दिसली होती. त्याने विचरले कोण ग? मला नही लक्ष्यात येत तिचा चेहरा.
त्याच्याकड़े आता "ती" उरलीच नव्हती आता पूर्णपणे फ़क्त "मी" आणी मीच होते.