बुधवार, ८ जून, २०११

सायबीणी ग़ोमंतक

फ़ूड किंग "रावस टिक्का"
नावाप्रमाणेच फ़ूड एकदम किंग सारखेच आहे. फ़ूड किंग मधली चिकन टिक्का बिर्याणी खुपच अफ़लातुन आहे.पण तिथला "रावस टिक्का" (तोंडाला पाणी सुटले) अजुनही चव विसरवत नाही.Edit

"रावस टिक्का"

"रावस टिक्का"

"रावस टिक्का"

"रावस टिक्का"

असा फ़क्त बझ टाकला आणी लगेच सुटलोच सगळे पटापट लाईक आणी कमेंट करत सुटले. आणी बोलता बोलत लगेच बेताही आखला .संध्याकाळी ६.३० वा दादर शिवाजी पार्कला भेटुन "सायबीणी ग़ोमंतकला"जायचे

4 people liked this - Anand Kale, भारत मुंबईकर, सचिन पाटील and स्नेहल -
Anand Kale - :( निषेद :( :( निषेद :( :( निषेद :(1:17 pm
Pankaj Z - च्यायला... नेमका जेवणाच्या वेळीच या बझ्झला यायचं होतं का... x-(1:18 pm
अनुजा सावे - निषेद कुबुल ;-0 निषेद कुबुल ;-0 निषेद कुबुल ;-0Edit1:18 pm
अनुजा सावे - पंक्या एन्जोय "रावस टिक्का" !Edit1:19 pm
स्नेहल - - निषेध1:19 pm
अनुजा सावे - आका निषेद काय जमेल तेव्हा जाऊया की .Edit1:19 pm
Pankaj Z - शटाप !!
"टिक्का"चे मराठी स्पेलिंग दिले हा माझाच गाढवपणा.
1:19 pm
सचिन पाटील - फूड किंग कुठे ?1:20 pm
Anand Kale - कधी कधी ग (तोंडाबाहेर लाळ गळतीय) .. :)1:20 pm
Pankaj Z - आम्ही येतो तेव्हा नेमका तुला वेळ नसतो नाही का...1:21 pm
अनुजा सावे - तु शुद्धलेखनाच्या नावाने ओराडतोस ना म्हाणुन.Edit1:21 pm
Anand Kale - येत्या शुक्रवारी मांसाहार करायचा मानस आहे... ठरवा ना यार... खुप दिवस झाले मांसाहार करुन.. :(1:22 pm
अनुजा सावे - पंक्या मला वेळ होता पण बाकी कोणालाच काहीना काही कारणाने जमाले नाही त्याला मी काय करणार रेEdit1:23 pm
अनुजा सावे - आका हल्ली कोण यायला बघत नाही रे प्लान केला की, जायचे असेल तर सांग आपण जाऊयाEdit1:24 pm
Anand Kale - जे जमतील ते या शुक्रवारी दादर गोमांतकला ६ वाजता भेटतील.. :) :) :)1:25 pm
अनुजा सावे - सचिन खार सबवे (पुर्वेला) आहे.Edit1:25 pm
अनुजा सावे - दादर गोमांतकला मी नाही येणार दुसरे कुठे असेल तर येईल.Edit1:26 pm
Anand Kale - मग तुच ठरवं कुठे ते..1:27 pm
सचिन पाटील - आज जायचं का ?1:29 pm
Anand Kale - आजही चालेल... :)1:30 pm
अनुजा सावे - दादर गोमांतकला मासे तितकेशे ताजे नसतात त्या पेक्ष्या "सायबीण गोमांतकला" चालेल.Edit1:31 pm
Anand Kale - कुठेही चालेल... मांस के लिए साला कुच भी करेगा... :)1:32 pm
सचिन पाटील - सायबीण गोमांतक कुठे आहे ?

किती वाजता कुठे भेटायचं ते सांगा.
1:32 pm
अनुजा सावे - दादर पार्कातच चन्द्रागुप्त समोरEdit1:33 pm (edited 1:34 pm)
Anand Kale - कधी जायचं मग... मी तयार आहे यायला आजही..बोला..1:35 pm
अनुजा सावे - बाकी मंडाळी काहिच रीप्लाय करीत नाहिEdit1:37 pm
अनुजा सावे - जेऊन आलेEdit1:38 pm
सचिन पाटील - खायचं असेल तर देतील रिप्लाय1:38 pm
सचिन पाटील - सुझे पण येतोय रे .... बोला किती वाजता नि कुठे भेटायचं ते ?1:41 pm
Anand Kale - ६ वाजता भेटू मग शिवाजी पार्कात1:53 pm
अनुजा सावे - ओके संध्याकाळी ६.३० वा दादर शिवाजी पार्क

सचीन(लग्नाची पार्टि दिली म्हणुन नाव पहिले लिहले ;-p) मी,ज्योती(जमले नाही) आका, सुहस,आशु पोचलो एकदाचे "सायबीणी ग़ोमंतकला" आणी सुटाली एका मागोमाग पर्मान सुटले.

मला बरेच दिवसा पासुन क्राब तंदुरी खायची होती. मग काय एकदची ऑर्डर देऊन टाकली .




१.कोळांबी फ़्राय
२.चिकन फ़्राय
३.क्राब तंदुरी
४.सुरमाई थाळी
५.बांगडा थाळी
६.कोळांबी थाळी
७.चिकन थाळी
८.मटण थाळी


क्राब तंदुरी खुपच मस्त होती इतकी मस्त की मी त्या अडकीत्याचा पण वापर केला नाही.


एकदम मनसोक्त जेवणाचा अस्वाद घेतला.





एवढ्या जेवणा नंतर"मसाला पान तो मंगता है" मसाला पान तोंडात कोंबुन जड पोटाने(जड पायानी नव्हे) घरी जायला निघालो. आता घरी जाई पर्यंत सुस्ती आणी झोपेची मारामारी करात जावे लागणार होते.

मंगळवार, ७ जून, २०११

आम्ही बावर्ची जाहलो !

आम्ही बावर्ची जाहलो !

सलाम सैनिक (लेह-लडख-कारगील) मोहीम चालु होऊन आजचा १५ वा दिवस ऊजाडल होता. आजचा दिवस आरामासठी राखीव होता. सकाळी न्याहारी कारता करता गप्पाच्या ओघात कधी आम्ही सगळे घरच्या ज़ेवणा पर्यंत कधी पोचलो कळालेच नाही.सगळ्यांनाच घरच्या जेवणाची आठवण येत होती

संजयने प्रस्तव मांडला आज आपण आपल्या पद्धतिचे जेवण बनऊया का? सगळ्यांचा एक मताने होकार आला. आम्हच्यातले २-3 जण होते त्यांना जेवण बनवणे हा प्रकर माहीतिच नव्ह्यता म्हणुन त्यांनी बाजारातुन सगळे सामन आणायची जबाबदरी हाती घेतली. पण प्रश्न होता कि हॉटेल मालक आपल्याला त्यांचे संयपाक घर वापरु देतील का? त्यांना आम्हि आमचा बेत सांगीतला त्यांनी ही लगेच संमती दिली. आणी महाराष्ट्रियन पद्धतीचे जेवण आमच्या साठीही बनवा असे सांगितले आम्ही १३ जण आणी ते ४ जण अशी १७ जणांच्या पंगतीची तयरि सुरु केली.

लेह-लडख मधे पश्मीना नावाची बकरीची जात जगप्रसीध्द आहेच.


आम्ही पश्मीना बकरीचे मटण रस्सा,सुकी कलेजी,जाडसर कोंबडीचा रस्सा(कोंबडी जाडसर नाही रस्सा जाडसर),डाळ,भात,चपाती असा मेनु ठरवला आणी त्या प्रमाणे सग़ळे सामन आणाले आणी जणुकाही आम्ही त्या हॉटेल च्या संयपाक घरावर कबजाच केला. सगळ्यांनी आपापल्या परीने हात-भार लावले कामाला.













मटण रस्याची जबाब दरी संजयने घेतली होती.



त्याने मटण शीजायला कुकर मधे ठेवले,अनुजा किती शीट्या घ्याव्या लागतीलग मी आपल्या नेहमिच्या अंदजे ६-७ घे असे सांगीतले,आम्हचे हे बोलणे तिथला कुक ग़ुरु समोरच चालले होते तेव्हा तो आम्ह्च्यावर हसत बोलला "१०-१२ सीटी में आलु भी नही पकता यहा पें मटण के लिये ३५-४० सीटी लेनी पडती है यहा" I

आम्ही एकमेकांकडे बघतच रहिलो आणी एकदम लक्ष्यात आले आपण किती कमी दाबाच्या पट्यात आहोत ते.

खुप धुमाकुळ घालुन एकदाचे सगळे जेवण तयार झाले.

आज आम्ही आम्हालाच खुष करायला जेवणाची थोडि फ़ार सजावट केली.


टेबलावरील सजावट आणी निट नीटकेपणा केला होता.

मस्त बावर्ची स्टाईल मधे फोटो घेतले.







मस्त जेवणाचा अस्वद घेतला.











हॉटेल मालक,हॉटेलचा मुकादम ,कुक,वेटर यांना "फ़ॉर अ चेन्ज"म्हणुन केलेले जेवण आवडले .



सोमवार, ६ जून, २०११

आई मावशी मावशी आई

आई मी मावशीकडे जाते. अग दिवसभरात १० वेळा तर फ़ेर्‍या मारात असतेस अजुन काय तुझ नवीन का हे "आई मी मावशीकडे जाते" (आईच आणी मावशीच घर तस २ -२५ पावलावरच)

आई मला मावशी खाऊ देते, नविन कपडे पण देते, आणी मी गेली का मला ती स्वता काही ना काही भरवतच असते. आणी ती मावशीकडची आजी माझ्यासाठी सुकी द्राक्ष आणी सुका ख़जुर पण देते. आणी तु आणी आपली आज़ी कधीच काही देत नाही.

हे त्या दिड-दोन वर्षाच्या कोवळ्या पोरीचे बोल एकत तिची आई तिच्याकडे एकटक बघत हसुन म्हणली जा तुझ्या मावशीकडेच आणी रहा तिच्या कडेच कायमची मी एकदम खुष होऊन पळाले, पण थोडावेळतच मी मवशीला म्हाटले मी जाते मला आई कडे जायचे आहे तिने ख़ाऊ नाही दिला तरी चालेल. आणि ते कवळे पाय घरा कडे धावले.

असे त्या चिमुरडिच्या बाबतीत नेहमीच होत असे.

सकाळी गाईचे दुध काढुन झाले कि आई मला रोज मामा सोबत मावशी कडे पठवीत असे. हे त्या चीमुरडीचे नित्य असे.

असेच एक दिवस सकाळी सकाळी मावशी आणी मामा काही कारणा वरुन जोर जोरत भांडात होते. आणी आजी त्याना हळुच सांगत होती तुम्ह्च्या पाई त्या कोवळ्या जिवाचा का छळ मांडला आहे.

आई आज खुप शांत होती तीने मझी रोजसारखीच तयारी केली मी आणि मामा मावशी कडे जायला नीघालो आज रोज सारखा मामा नवीन काहि तरी गंम्मत सांगणार पण आज मामा पण शांत होता" मामा आज कोणाची गंम्मत " माझ्या कडे आज एक गंम्मत होति पण तुझ्या मवशीने दम दिला आहे मला सांगु नको नाही तर सांगिताले असते ".

मला कहीच कळले नाही मी त्याच्याकडे बघतच रहिले.

"अग तु जीला आई सांगतेना ती तुझी आई नाही आणी मावशी सांगते ती मावशी नही."

मला मामाचे बोलणे कहीही कळेना आणी यात गंमत ती काय होती? मी ते कहिच न बोलता चालत होते. आणी मावशीकडे पोचल्यावर मामा जायचीवाट बघत रहिले.

मामागेल्यावर मी मावशीला विचारले "अग तु जीला आई सांगतेना ती तुझी आई नाही आणी मावशी सांगते ती मावशी नही." अशी आज मला मामाने गंमत सांगितली.पण त्यात कही गंमतच नव्हती ग मावशी. तेव्हा मला मावशीने सारा प्रकार सांगीतला
तेव्हा मला सारे समजण्या पलीकडे होते. पण मी त्याच दिवशीपासुन मावशी म्हणजे आई कडे राहायला आले.

पण हि गंमत जशीच्या-तशी माझ्या मनात कोरुन राहिली ती ही कायमची.


अनुजा सावे

शनिवार, १४ मे, २०११

वाहतुक नियंत्रण पोलिस

काल संध्याकाळी काही कामा निमीत्त इर्ला (विले पार्ले)ला गेले होते , काम उरकताच ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करत निघाले. अंधेरी स्थानकासाठी रीक्षा मीळण्याचा चान्सच नाही तिथुन पण तरी प्रत्तेक रीक्षेला हात दाखवतच होते. एकाने रीक्षा थांबाऊन विचाराले, "अंधेरी स्टेशन" तर उद्दटा सारखा चेहरा करुन मझ्यावराच वैताकला आणी निघुन गेला. मला हे अपेक्षीताच होते की असेच काही तरी होणार म्हणुन मी काहि लक्ष दिले नाही. तेवढ्यात त्या रिक्ष्याच्या मागच्या बाजुला उजव्या लेन मधुन कोणी तरी ओरडाले "काय हो तो नाही बोलला का? " वर पाहीले वाहतुक नियंत्रण पोलिसंची गाडी होती.

मी खुणेनीच "नाही बोलला तो"असे सांगीताले आणी त्यागडी चालकाने ग़ाडीचा वेग वढाऊन ज्यानीं मला विचारले होते त्यानिं त्या रीक्ष्यावर जोर जोरत हाताने २-३ थाप मारले आणी त्या चालकाने त्या रीक्ष्या समोर त्यांची गाडी आडवि घतलि त्या रिक्ष्यावाल्याला चार गोष्टि सुनावल्या . तो पर्यंत मी मागुन धावत येऊन त्या रिक्ष्यात बसले . आणी त्या वाहतुक नियंत्रकाना धन्यवाद देउन निघाले. स्टेशन वर पोचे पर्यंत १८ रु मिटर झाले होते माझ्या कडे ८रु सुट्टे नसल्याने मी २० रु दिले त्याने १५ रु घेताले आणी पैसे देता देता बोलला "अभी छुट्टे के लीये मच मच किय तो और एखाद पुलीस वाला देखेगा बीना भाडा लिये भागना पडेगा"

बुधवार, २ मार्च, २०११

तो ती आणी मी

तो ती आणी मी

रोज एकाच ट्रेनने येत असल्याने रोज सकाळी एकमेकांना बघण होत असे. २-३ वर्षा पासून ऑरकुट/फेसबुकवर एकमेकनंच्या फ्रेंड लिस्ट मधे होतो पण कधी काही बोलणे झाले नव्हते. ना समोरा-समोर ना कधी मेलवर ना च्याटवर किव्हा स्वतःहुन कधी बोलावेसे पण वाटल नव्हते. आम्ही जश्य २-३ मैत्रिणी नेहमी नाश्ता करायला पणशीकर मधे जात असत तसेच तो आणी त्याचे ही मित्र मैत्रीणी नेहमी येत असत, समोरासमोर येणे जवळ जवळ रोजचेच झाले होते.

आचानक एक दिवस त्याच्या एक मित्राने हळूच स्माईल दिली आणी मी ही ओळखीचाच असल्याने गालातल्यागालात हसले. आणी रोज सारखेच आपआपल्या मर्नागे निघून ही गेलो.

ऑफिस मधे येउन रोज प्रमाणेच मेल चेक करत होते, त्याच्या मित्राचा मेल होता.
"माझ एक काम आहे तुझ्या कड़े थोड़ी हेल्प हावी आहे करशील का?"
काय काम आहे,काय मदत हावी आहे हे जाणुनन घेताच मी उत्तर दिले "जमल्यास नक्कीच करेल".

आणी आवघ्या ५ मी.त्याच्या मेल आला "अग आपण एकमेकांच्या फ्रेंडलिस्ट मधे इतके वर्ष आहोत पण कधीही बोललो नाही,पण माझे एक काम आहे तुझ्या कड़े आणी माझा तो मित्र म्हणाला बहुदा तू मदत करशील म्हणुन हा मेल आणी माझा फोन नं.पण देतो जमल्यास फोन कर"

मी विचारच करत राहिले ह्या दोघांचे काय असे काम असेल ?

आणी मग थोडा वेळाने च्याटवर बोलता-बोलता समजले की "त्याला एक मुलगी आवडते माझ्याच गावची आहे आणी तिची ओळख करून हावी आहे". त्याला म्हणून तो आणी त्याचा मित्र मला मदत करायला सांगत होता.
मी म्हटले आधी कोण मुलगी आहे ते तर दाखवा मग बघुया पुढच पुढे.
उद्या सकाळी रोज सारखेच आपण तिथेच भेटूया आम्ही तुला ती मुलगी दाखवतो.
ठीक आहे .
ठरल्या प्रमाणे आम्ही भेटलो ती मुलगी कोण ते पाहिले आणी मी सांगीतले बघुया प्रयत्न करून पण मला थोड़े दिवस द्या.
आता आमचे बोलणे नियमित होऊ लागले कधी नाश्ता करताना,कधी फोनवर,कधी च्याटवर.
आणी २-३ दीवसांनी आम्ही संध्याकाळी कॉफी साठी भेटलो. त्याला बरेच काही बोलायचे होते तो त्याच्या बद्दल तीच्या बद्दल असे बरेच काही बोलत होता.
आणी त्या नंतर अवघ्या २ दिवसांनी त्याच्या बोलण्यतली "ती" कमी होताना जाणवत होती.
आम्ही एकमेकांन बद्दलच फ़क्त बोलत होतो आणी जाशी जाशी त्याच्या बोलण्यातील "ती" कमी होत होती तस तसे आमच्या बोलण्यात "आम्हीच आम्ही" होतो.

आणी हळुहळू आमचा एकमेकांन सोबत जास्त वेळ जाऊ लागला. आता जातानाही आम्ही एकत्रच जाऊ लागलो. कधी त्याला उशीर झाली की मी थांबत असे, कधी त्याला जास्तच उशीर होणार असेल तर मी त्याला त्याच्या ऑफिस बाहेर जाऊन भेटत असे. सकाळी उठल्या पासून फोन,मेसेज,च्याट हे असे झोपे पर्यंत चालू असे.
आणी सकाळी सहज बोलताना आज तिची आठवण झाली आणी सहजच मी त्याला सांगीतले अरे आज बरेच दिवसंनी ती मला दिसली होती. त्याने विचरले कोण ग? मला नही लक्ष्यात येत तिचा चेहरा.

त्याच्याकड़े आता "ती" उरलीच नव्हती आता पूर्णपणे फ़क्त "मी" आणी मीच होते.